कर्जमाफी केवायसीत मोठा बदल! आता अशी होणार केवायसी

Loan Waiver KYC : महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या मोहिमेत पारदर्शकता आणण्यासाठी सहकार विभागाने नवीन नियमावली आणि एसओपी (SOP) जाहीर केली आहे. जर तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग, या संपूर्ण प्रक्रियेवर सविस्तर नजर टाकूया.

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार केवायसी प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता मोबाईल वा ओटीपीद्वारे नाही, तर केवायसी फक्त आणि फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच पार पाडली जाणार आहे. या ब्लॉगमध्ये आपण या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर आणि साध्या मराठी भाषेत माहिती घेणार आहोत, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला तिचा अचूक फायदा घेता येईल.

कर्जमाफीची पहिली यादी आली; पहा जिल्ह्यानुसार यादी

कर्जमाफीच्या याद्यांचे प्रकाशन सुरू

राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार २२ जुलै २०२६ पासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेशी संबंधित हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर ५५३ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे. याशिवाय, सुमारे ७ लाख ४८ हजार २९६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी येत्या एक-दोन दिवसांत जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जमाफीची पहिली यादी आली; पहा जिल्ह्यानुसार यादी

केवायसी प्रक्रियेत सर्वात मोठा बदल: आता फक्त बायोमेट्रिक!

यादीत नाव आल्यानंतरची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ‘कर्जमाफीची केवायसी (KYC)’ पूर्ण करणे. ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते.
या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात सहकार विभागाचे अव्वल आयुक्त आणि विशेष निबंधक सहकारी संस्था (नागनाथ एगलेवाड) यांनी नवीन मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या आहेत. या नवीन नियमांनुसार:
ओटीपी पद्धत पूर्णपणे बंद: आता केवायसीसाठी मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीचा (OTP) कोणताही वापर केला जाणार नाही.
फक्त बायोमेट्रिक (Biometric): प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आपली केवायसी फक्त आणि फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच (थंब/अंगठा देऊन) पूर्ण करावी लागणार आहे.

केवायसी प्रक्रिया नेमकी कशी पार पाडावी?

ज्या वेळी कर्जमाफीच्या यादीत तुमचे नाव येईल, त्यानंतर तुम्हाला खालील साध्या टप्प्यांचे पालन करावे लागेल:
कागदपत्रे तयार ठेवा: आपले नाव तपासल्यानंतर आपला आधार क्रमांक आणि ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) सोबत ठेवा.
आपle सरकार सेवा केंद्र: आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ (CSC Center) प्रत्यक्ष भेट द्या.
तपशील पडताळणी: सेवा केंद्रावरील पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर तुमच्या आधार आणि फार्मर आयडीनुसार तुमच्या कर्जखात्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दर्शवली जाईल.
बायोमेट्रिक प्रमाणीकरण: जर दिलेली सर्व माहिती अगदी बरोबर असेल, तर आधार ऑथेंटिकेशन म्हणजेच बायोमेट्रिकद्वारे तुमची केवायसी सबमिट करायची आहे.

माहिती चुकीची असल्यास काय कराल?

कसोटीच्या किंवा पडताळणीच्या वेळी जर असे लक्षात आले की, कर्जखात्याची माहिती, आधार नंबर किंवा इतर तपशीलामध्ये काही चूक आहे, तर तुम्हाला घाबरण्याचे अजिबात कारण नाही. तुम्ही त्याच वेळी केवायसी केंद्रावर आपला आक्षेप नोंदवू शकता. तुम्ही नोंदवलेला हा आक्षेप पुढे पडताळणीसाठी तालुकास्तरीय समितीकडे पाठवला जाईल.

केवायसी झाल्यानंतर खात्यात पैसे कधी जमा होणार?

सर्वात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या शेतकऱ्याची केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण होऊन सबमिट केली जाईल, त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये पुढील अवघ्या ४८ तासांच्या आत सहकार विभागामार्फत कर्जमाफीची रक्कम जमा (Credit) केली जाणार आहे!


Leave a Comment