Farmer Loan Waiver : राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला तुफान वेग आला आहे. येत्या अवघ्या दोन दिवसांत तब्बल १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जखाती पूर्णपणे निरंक (Nil) होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्र्यांनी केली आहे.
शासनाने या योजनेसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून, अनेकांना बँकांकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवातही झाली आहे. पण आता प्रश्न असा आहे की, सोमवारपासून ज्या ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत, त्यात तुमचं नाव आहे का?
नवीन यादी कधी प्रसिद्ध होणार? अडकलेल्या याद्यांचं नेमकं काय झालं? आणि ओटीएस (OTS – एकरकमी तडजोड) योजनेतील शेतकऱ्यांसाठी शासनाने काय तातडीचा आदेश दिला आहे?