शेतकऱ्याचा बाजारमंत्र
उत्पादन काढायला आपण शिकलो, पण माल विकायला कधी शिकणार?
नमस्कार शेतकरी मित्रांनो..
रात्रंदिवस घाम गाळून, रक्ताचे पाणी करून आपण भरघोस पीक घेतो, पण जेव्हा माल बाजारात घेऊन जातो तेव्हा योग्य भाव मिळत नाही. “उत्पादन काढायला आपण शिकलो, पण माल विकायला कधी शिकणार?” याच प्रश्नाचे उत्तर आणि तुमच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ‘शेतकऱ्याचा बाजारमंत्र’ हे खास ई-बुक.
हे पुस्तक तुम्हाला केवळ ‘पुस्तकी माहिती’ देत नाही, तर बाजारात स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचे आणि खिशात चार पैसे जास्त आणण्याचे ‘प्रॅक्टिकल तंत्र’ शिकवते.
थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक तुम्हाला ‘काबाडकष्ट करणारा आणि हतबल शेतकरी’ या भूमिकेतून कायमचे बाहेर काढेल आणि एका ‘स्मार्ट, अभ्यासू आणि यशस्वी कृषी-उद्योजकाच्या भूमिकेत नेऊन बसवेल.
चला तर मग, बाजारावर राज्य करण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया!
आजच डाउनलोड करा – फक्त ₹९९या ई-बुकमध्ये तुम्ही काय शिकणार आहात?
- तुमच्या १ किलो मालाचा खर्च कसा काढायचा?
- बाजारात शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळवायचा?
- बाजाराची मागणी कशी ओळखावी?
- शेतमाल विक्रीचे स्मार्ट पर्याय
- बाजारातील तेजी-मंदी आणि चढ-उतार अचूक कसे ओळखायचे?
- ‘होल्ड अँड सेल’ तंत्र: माल कधी साठवावा आणि कधी विकावा?
- माल विकायला नेण्यापूर्वी काय तयारी करावी?
- अशा अजून अनेक महत्त्वाच्या ट्रिक्स तुम्ही शिकणार आहात.