निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाचा लपाछपीचा खेळ यामुळे बळीराजा चांगलाच संभ्रमात पडला आहे. कधी कडक ऊन तर कधी मुसळधार पाऊस! जुलै महिना संपता-संपता पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात दमदार एन्ट्री मारली आहे. पण आता पुढे काय? ३१ जुलैला ढगफुटीसदृश पाऊस कुठे पडणार? ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतीची कामे करण्यासाठी उघडीप मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या धरणांची आणि विहिरींची पातळी किती वाढणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखामध्ये मिळतील. चला तर मग, जाणून घेऊया हवामानाचा सर्वात अचूक आणि सविस्तर अंदाज!
३१ जुलैचा ‘धक्कादायक’ अलर्ट: उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशला सावधानतेचा इशारा!
सध्या बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्राच्या सीमेवर पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. ३१ जुलै रोजी खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, शहादा या भागांसोबतच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भोकरदन, जाफ्राबाद, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, सोयगाव आणि शिरपूर या पट्ट्यात तर ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे स्थानिक नदी-नाल्यांना अचानक पूर येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुसरीकडे पुणे, इंदापूर, सांगली आणि सोलापूर भागातही पावसाची रिपरिप चालूच राहणार आहे.
फक्त 60 रुपयात आता सर्व जमिनीचे ऑनलाईन नकाशे.. पहा फायद्याची बातमी
ऑगस्टची सुरुवात: पावसाची उघडीप की पुन्हा जोरदार बॅटिंग?
अनेक शेतकरी पावसाची उघडीप कधी मिळेल, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजे, १ आणि २ ऑगस्टच्या दरम्यान लातूर, नांदेड, जालना तसेच छत्रपती संभाजीनगरच्या काही वरच्या पट्ट्यात पावसाची थोडीफार विश्रांती (उघडीप) मिळू शकते. पण लक्षात ठेवा, आकाश पूर्णपणे स्वच्छ आणि निरभ्र नसेल; सोसाट्याचा वारा आणि पावसाची हलकी भुरभुर चालूच राहील.
कर्जमाफी KYC करावी का? पहा NPA शेतकरी कर्जमाफीचा नियम
पण ही विश्रांती फार काळ टिकणार नाही मित्रांनो! ३ ऑगस्टपासून पावसाचा दुसरा अत्यंत मोठा आणि आक्रमक टप्पा सुरू होईल. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, बीड, धाराशिव आणि लातूर या भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सक्रिय होईल. ५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राचा ७०% भाग पावसाने व्यापलेला असेल आणि ७-८ ऑगस्टपर्यंत हा आकडा ९० ते १०० टक्क्यांवर जाईल!
धरणातील पाणीसाठा आणि शेतकऱ्यांसाठी खास सल्ला
सध्याच्या प्रस्थापित पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आपल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आताच ७० टक्क्यांवर पोहोचला असून, येत्या काही दिवसांत तो सहज ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. यामुळे भविष्यात परतीचा पाऊस आल्यावर गोदावरी काठच्या शेतकऱ्यांसमोर पुराचे मोठे संकट उभे राहू शकते, याची जाणीव आतापासूनच ठेवणे आवश्यक आहे.
विहिरीच्या पाण्याची चिंता मिटणार
जे शेतकरी विहिरीला पाणी कधी येणार याची चिंता करत आहेत, त्यांनी आता अजिबात काळजी करू नये. जमिनीतून पाण्याचे झरे फुटायला सुरुवात झाली असून येत्या काही आठवड्यांत विहिरी तुडुंब भरणार आहेत.