पाऊस 24 तासात या ठिकाणी बरसणार; पहा तोडकर साहेबांचा अंदाज

राज्यात मान्सून दाखल होऊन अनेक दिवस उलटले असले तरी, महाराष्ट्रातील काही भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भ आणि खानदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, मराठवाड्यातील काही जिल्हे अजूनही तहानलेलेच आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे ‘यंदा दुष्काळ तर पडणार नाही ना?’ अशी चिंता बळीराजाला सतावत आहे. मात्र, हवामान अभ्यासक अशोक तोडकर साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या २४ तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे होणार दमदार पाऊस?

तोडकर साहेबांच्या सुधारित अंदाजानुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने आपली ८० ते ९० टक्के व्याप्ती आधीच पूर्ण केली आहे. तिथे नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. आता उर्वरित महाराष्ट्राची, विशेषतः मराठवाड्याची पाळी आहे. येत्या २४ तासांत खालील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे:
बीड आणि लातूर: ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाची सर्वाधिक प्रतीक्षा होती, तिथे आता पावसाला दमदार सुरुवात होणार आहे.
धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर: या पट्ट्यातही पावसाची व्याप्ती वाढून चांगल्या पावसाची नोंद होईल.
जालना आणि छत्रपती संभाजीनगर: या भागांमधील जे तालुके अद्याप कोरडे होते, तिथेही ६० ते ७० टक्के भागात पाऊस कव्हर होईल. सांगली आणि दक्षिण महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचा प्रभाव वाढून मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

पुढील ३ ते ४ दिवस अतिशय महत्त्वाचे!

येत्या २४ ते २७ तारखेपर्यंत मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर इतका राहील की, काही ठिकाणी सलग सूर्यदर्शनही होणार नाही, असे तोडकर साहेबांनी स्पष्ट केले आहे. मान्सूनची स्थिती आता अतिशय बळकट झाली असून, दुष्काळाच्या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत, त्यावर शेतकरी बांधवांनी अजिबात विश्वास ठेवू नये.

पेरणीबाबत तोडकर साहेबांचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला:
सध्या पावसाला सुरुवात होत असली तरी, शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. जमिनीत जोपर्यंत पुरेसा ओलावा जात नाही आणि सलग चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी यंत्रात बी टाकू नका. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पेरण्या थोड्या उशिराच होतात, हा इथला पॅटर्न आहे. त्यामुळे दोन-चार दिवस उशीर झाला तरी चालेल, पण अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी करून दुबार पेरणीचे संकट ओढवून घेऊ नका.

Leave a Comment