loan waiver kyc rule : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे. मात्र, कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर झळकल्यापासून शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे! पोर्टलवर दिसणारी रक्कम आणि प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यात मोठी तफावत दिसत आहे. त्यामुळे “आपल्याला खिशातून वरचे पैसे भरावे लागतील का?”, “अशा परिस्थितीत KYC करावी की नाही?” असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या गैरसमजुतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपली KYC पूर्ण केलेली नाही. पण शेतकरी मित्रांनो, काळजीचे कोणतेही कारण नाही! सहकार विभाग आणि बँकर समितीने यावर अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. चला तर मग, या गोंधळामागचे सत्य, बँकेचे NPA नियम आणि वन-टाईम सेटलमेंट (OTS) ची प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.
कर्ज रकमेतील तफावत का दिसतेय?
सध्या पोर्टलवर तुम्हाला जी रक्कम दिसत आहे, ती तुमच्या एकूण कर्जाची रक्कम नाहीच! ती रक्कम म्हणजे बँकेने ‘सूट’ (Sacrifice) दिल्यानंतरची उर्वरित रक्कम आहे.
२०१९ पासून थकीत असलेली राज्यातील अनेक कर्जखाती आता NPA (Non-Performing Asset म्हणजेच बुडीत खाती) मध्ये गेली आहेत. अशा खात्यांसाठी शासनाने बँकांसोबत मिळून ‘वन-टाईम सेटलमेंट’चा (OTS) मार्ग काढला आहे.
येथे मिळतील कर्जमाफीच्या याद्या
NPA सेटलमेंटचे नवे नियम काय आहेत?
तुमचे कर्जखाते बँकेने कोणत्या तारखेला NPA घोषित केले, यावर तुम्हाला मिळणारी सूट अवलंबून आहे. ३ जून २०२६ रोजी बँकांसोबत झालेल्या बैठकीत खालीलप्रमाणे सूट देण्याचे ठरले आहे:
३० सप्टेंबर २०२१ पूर्वी NPA: जर खाते या तारखेपूर्वी NPA झाले असेल, तर सेटलमेंट केवळ ३५% रकमेवर होईल. म्हणजे उरलेली ६५% रक्कम बँक तुम्हाला सूट म्हणून देईल.
१ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२: या काळात खाते NPA झाले असल्यास ४५% सेटलमेंट.
१ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३: या काळात खाते NPA झाले असल्यास ५५% सेटलमेंट.
१ ऑक्टोबर २०२३ ते २०२४: ७०% सेटलमेंट.
१ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५: ८५% सेटलमेंट.
येथे मिळतील कर्जमाफीच्या याद्या
हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया
समजा, तुमच्यावरील एकूण कर्ज १,६०,००० रुपये आहे आणि तुमचे खाते ३० सप्टेंबर २०२१ ला NPA झाले आहे.
नियमानुसार बँक तुम्हाला ६५% सूट देईल. म्हणजे ८८,००० रुपये बँक स्वतःहून सोडून देईल.
आता पोर्टलवर तुम्हाला फक्त उरलेली ३५% रक्कम म्हणजे ७२,००० रुपये दिसतील.
हे जे ७२,००० रुपये दिसत आहेत, ते शासनाकडून कर्जमाफी योजनेतून (२ लाखांच्या मर्यादेत असल्याने) भरले जातील. तुम्हाला तुमच्या खिशातून काहीही द्यायचे नाही!
मग अशा परिस्थितीत KYC करावी का?
होय, १००% करावी! पोर्टलवर दिसणारी रक्कम ही बँकेने सूट वजा केल्यानंतरची रक्कम आहे, जी शासनाकडून माफ केली जाणार आहे. तुमचे मूळ कर्ज जर २ लाखांच्या आत असेल, तर तुम्हाला स्वतःला काहीही भरावे लागणार नाही. त्यामुळे रकमेतील तफावत पाहून अजिबात घाबरून जाऊ नका. लवकरात लवकर तुमची KYC पूर्ण करून घ्या, जेणेकरून योजनेचा लाभ तुम्हाला वेळेत मिळेल.
तरीही काही शंका असल्यास काय करावे?
दोन लाखांच्या आतील कर्जाबाबत ही वरील प्रक्रिया लागू आहे. तरीही तुम्हाला पोर्टलवरील रकमेबाबत काही शंका असल्यास:
१. तुम्ही पोर्टलवर ‘ग्रीव्हन्स’ (तक्रार) बुक करू शकता.
२. तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालयात जाऊन यासंदर्भातील लेखी तक्रारही देऊ शकता.
महत्त्वाची विनंती: ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्या संपर्कातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आणि व्हाट्सअँप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही आणि सर्वांना कर्जमाफीचा लाभ घेता येईल. जय बळीराजा!