या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही; लिस्ट आली समोर

शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ‘शेतकरी कर्जमाफी’. शासनाने मोठ्या थाटामाटात घोषणा तर केली आहे, पण या कर्जमाफीचा फायदा नेमका कुणाला होणार आणि कुणाला नाही, यावरून अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. ५ जुलै नंतर राबवल्या जाणाऱ्या या योजनेत शासनाने अनेक अटी आणि शर्ती घातल्या आहेत. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की, या नव्या कर्जमाफी योजनेसाठी नक्की कोण ‘अपात्र’ ठरणार आहे. चला तर मग, या अटी सविस्तर जाणून घेऊया.

कोण आहेत कर्जमाफीसाठी ‘अपात्र’? (पहा लिस्ट)

१. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी:
कोणतेही आजी-माजी मंत्री, खासदार (लोकसभा/राज्यसभा), आमदार (विधानसभा/विधानपरिषद), तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे विद्यमान व माजी सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
२. सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी:
केंद्र किंवा राज्य शासनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन २५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, ते यातून थेट बाद आहेत. याव्यतिरिक्त महावितरण, एसटी महामंडळ, एमआयडीसी यांसारख्या राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमांमधील आणि अनुदानित संस्थांमधील २५ हजारांहून अधिक पगार असलेले कर्मचारीही अपात्र आहेत.
३. प्राप्तिकर (Income Tax) भरणारे नागरिक:
शेती सोडून इतर कोणत्याही व्यवसायातून किंवा नोकरीतून उत्पन्न मिळवून जे लोक इन्कम टॅक्स भरतात, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.
४. निवृत्ती वेतनधारक (Pensioners):
ज्या व्यक्तींना दरमहा २५,००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते, ते या योजनेसाठी पात्र नसतील. (अपवाद: माजी सैनिकांना या अटीतून वगळण्यात आले आहे, म्हणजेच ते पात्र राहतील).
५. सहकारी संस्थांचे पदाधिकारी व उच्चपदस्थ:
कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, नागरी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि दूध संघ यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ तसेच २५ हजारांवर पगार असलेले या संस्थांचे अधिकारी व कर्मचारी या योजनेच्या कक्षेबाहेर आहेत.
(महत्त्वाची टीप: सहकारी साखर कारखान्यांमध्ये काम करणारे ‘हंगामी कामगार’ मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील, त्यांना यातून वगळण्यात आलेले नाही.)

कर्जाच्या तारखा आणि मुदतीचे निकष:

जुने कर्जदार: १ एप्रिल २०१९ च्या आधी ज्यांनी कर्ज घेतले आहे, ते या कर्जमाफीस अपात्र असतील.
मागील लाभार्थी: ज्यांनी २०१९ च्या कर्जमाफीचा आधीच लाभ घेतलाय, तेही बाद ठरतील (त्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर रक्कम मिळण्याची तरतूद आहे).
नवीन कर्जदार: ३१ मार्च २०२६ नंतर कर्ज उचललेले शेतकरी यात बसत नाहीत.
नियमित कर्जफेड करणारे: जे शेतकरी कर्जमाफीच्या दोन वर्षे आधीपासून नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत, त्यांना ही कर्जमाफी लागू होणार नाही (कारण त्यांच्यासाठी शासनाची वेगळी प्रोत्साहनपर योजना आहे).

Leave a Comment